शेततळ्यात बेवारस व्यक्तीचा आढळला मुत्यु देह
घातपात की अपघात ? पिंपरणे गावात उलट सुलट चर्चेला उधाण
नगर सिटीझन live टिम-
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील बिरोबा वस्ती हद्दीत जया गिरीष तळोले यांच्या गट नंबर ७० मधील शेतातील शेत तळ्यामध्ये दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयाचा अनोळखी बेवारस पुरुष इसमाचा मुत्यू देह आढळून आल्याने हा अपघात की घातपात अशी गावात व वस्तीवर उलट सुलट चर्चा रंगली होती.
तरी या बाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार ,मौजे पिंपरणे गावचे हद्दी बिरोबा वस्ती हद्दीत जया गिरीष तळोले यांच्या गट नंबर ७० मधील शेतातील शेत तळ्यामध्ये दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयाचा अनोळखी बेवारस पुरुष इसमाचा मुत्यू देह आढळून आला होता .त्यामुळे हा इसम कोण आहे, येथे कशाला आला होता, हा अपघात आहे की घातपात अशी उलट सुलट चर्चा गावात होती इसम बेवारस असून त्याच्या मुत्युचे कारण समजले नसले तरी त्यास शेततळ्यातून बाहेर काढले अंदाजे नऊ ते दहा दिवसापासून तो मृत्यूदेह शेततळ्यात होता त्यामुळेे तो अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोलीसानी पंचनामा करून त्याचा अंत्यविधी शेतातच केला याकामी पोलिसांना पोलीस पाटील विनोद साळवे मंजाबापू साळवे साहेबराव रहिंज ग्रामपंचायत सदस्य अरुण राहिंज बबलू रक्टे यांनी मदत केली या घटनेची नोंद संगमनेर ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी आकास्मित मृत्यु अशी करण्यात आली असून या पुढील तपास संगमनेर ग्रामिण पोलिस स्टेशनचे पो नि पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय व्ही आर खंडीझोड, हेड कॉन्स्टेबल एस आर बढे,पोलिस नाईक शिवाजी डमाळे, नितीन शिंदे, बाबा खेडकर, बाबासाहेब शिरसाट, पाटील करीत आहेत.