तिसगाव येथील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी ,सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 30 एप्रिल 2021
तिसगाव येथील सरकारी आरोग्य केंदात लसीकरण चालू असुन या ठिकाणी दररोज लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.या ठिकाणी दररोज १००० - १२०० नागरिक येतात.
यामध्ये काही लस घेण्यासाठी तसेच काही आजारी असणारे व्यक्ती ,कोरोना चाचणी करणाऱ्यासाठी तिसगाव,मांडवे,घाटशिरस,मढी,हनुमान टाकळी,कासार पिंपळगाव,आदिनाथनगर,चितळी,पाडळी या परीसरातून नागरिक येत आहेत.
परंतु या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा माञ फज्जा उडाला आहे.
या ठिकाणी आरोग्य केंद्रात लसीचा पुरवठा माञ कमी प्रमाणात उपलब्ध होत असुन काही व्यक्ती लस न घेताच घरी परत जात असून लस घेण्यासाठी दररोज आरोग्य केंदात हेलपाटे मारत आहेत.
काही व्यक्तीमध्ये गर्दीमुळे रांगेसाठी आपआपसात भांडणेही होत असून व्यक्ती सामाजिक अंतर पाळत नसून यामुळे संपर्कातून कोरोना बाधित रुग्ण होण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाने तिसगाव येथील केंदात लसीचा पुरवठा जास्तीत जास्त वाढवावा.अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.