महाराष्ट्र
26171
10
नवजीवन डे स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
By Admin
नवजीवन डे स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
सिन्नर तालुका प्रतिनिधी -
27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज (वि. वा .शिरवाडकर) यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे शिक्षण अधिकारी श्री बी .बी .पाटील सर तसेच शाळेच्या प्राचार्या सौ अनिता सूर्यवंशी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती गुजराथी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सविता फड या मराठी विषयाच्या अध्यापिका असून त्यांनी आपल्या मराठी गौरव दिनाबद्दल माहिती दिली 27 फेब्रुवारी दिवस मराठी भाषेचा समृद्ध वारसा साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्याचा सोहळा आहे 27 फेब्रुवारी "मराठी भाषा गौरव दिन" आपल्या मातृभाषेचा सन्मान आणि संवर्धन करण्यासाठी आणि तसेच नवीन पिढीला अभिमान वाटण्यासाठी शाळेत व राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा होतो "मराठी भाषा गौरव दिन" ":माझा अभिमान" "माझा मराठीची बोलू कौतुके!! परी अमृता तीही पैजासी जिंके!! "संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे गोडवे गायले आहेत मराठी ही केवळ भाषा नसून आपली संस्कृती अस्मिता आणि भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन "म्हणून साजरा केला जातो 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेतील श्रेष्ठ कवी नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण "कुसुमाग्रज" म्हणून ओळखतो त्यांचा जन्मदिवस आहे कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली विशेषतः विशाखा काव्यसंग्रह, आणि नटसम्राट नाटक ही मराठी साहित्यातील रत्ने आहेत त्यांचा या अमूल्य योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने 2013 पासून त्यांचा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला मराठी भाषेची समृद्ध मराठी ही भारतातील प्रमुख आणि प्राचीन भाषेपैकी एक आहे या भाषेला हजारो वर्षाचा इतिहास आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या अभंगापासून ते आधुनिक साहित्यिक पर्यंत मराठी साहित्य विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार अशी तिची ओळख आहे साजरा करण्याचा उद्देश आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेचा वापर वाढवावा नवीन पिढीला भाषेचा आणि साहित्याचा वारसा कळावा हा या दिवसा मागील उद्देश आहे 27 फेब्रुवारी रोजी शाळेमध्ये निबंध स्पर्धा काव्यवाचन वकृत्व स्पर्धा आणि मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले जाते आपली मातृभाषा ही आईसारखी असते तिचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे मराठी बोलूया मराठी वाचूया आणि मराठीचा अभिमान बाळगू या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी यावेळी शाळेतील विद्यार्थी प्रतीक कांबळे, तेजस्विनी परबत ,तन्मय लहामगे या विद्यार्थ्यांचे भाषणे केली पोवाडा सादरीकरण- सत्यम भिलोरे, सार्थक वनवे, प्रतीक शर्मा यांनी केले भारुड -अस्मिता देशमुख, ऋता वैष्णव यांनी केले तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी नाटक नृत्यकला सादर केले कार्यक्रमाचे नियोजन माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ स्मिता लुटे प्रियंका देशपांडे प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ प्रतिभा गावंदे, सौ कामिनी गीते ,प्रज्ञा आहेर यांनी केले यावेळी सौ योगिता भाटजिरे, सविता चासकर ,श्री नरेंद्र वाघ सर, श्री शरद शिंदे सर, अमर बैरागी सर ,श्री संदीप काळे सर, श्री जितेंद्र शिंदे सर , राहुल चव्हाण सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी सौ मयुरी देशमुख व गौरी परदेशी यांनी आभार व्यक्त केले
Tags :
26171
10




