पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील 'या' तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
हप्तेखोरी केल्याची उघड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 04 मे 2021 मंगळवार
शेवगाव तालुक्यात पकडलेली वाळूची ट्रक सोडून देणे व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालून देण्यासाठी 15 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी शेवगाव पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तिघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत कान्हु फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदिप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांचे नावे आहेत. हे तिघे पसार झाले आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने 7 एप्रिल रोजी पकडली होती. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज यासंदर्भात तिघां पोलिसांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.