महाराष्ट्र
91402
10
अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्याऱ्यांना मिळणारी मदत
By Admin
अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्याऱ्यांना मिळणारी मदत अपूर्ण राहिल्याबाबत व पेरणीसाठी जाहीर केलेली मदत तातडीने देण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन
पाथर्डी तालुका- अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्याऱ्यांना मिळणारी मदत अपूर्ण राहिल्याबाबत व पेरणीसाठी जाहीर केलेली मदत तातडीने देण्याबाबत तहसिलदार तथा कार्यकारी दंडअधिकारी नाईक साहेब यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन (दि.२९) देण्यात आले.निवेदन पञामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.
आमच्या पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिक, जनावरांचे चारा तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. आज दिनांक २९ ऑक्टोबर ला देखील पहाटेपासून संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरु आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टीची दखल घेऊन मदत जाहीर केली होती तसेच दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्ष पाहता फक्त मोजक्या शेतक-यांच्या खात्यातच ही रक्कम जमा झालेली असून, बहुसंख्य शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.तसेच सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पेरणीसाठी हेक्टरी १०,००० रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते.
परंतु ती मदतही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली नाही. यामुळे आगामी हंगामासाठी बियाणे, खत, मजुरी यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
म्हणून आपणास विनंती आहे की, पाथर्डी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची यादी तपासून, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत जमा झालेली नाही, त्यांना तात्काळ ती मदत वितरित करण्यात यावी. पेरणीसाठी जाहीर केलेली १०,००० रुपये प्रति हेक्टर मदत सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने द्यावी.
महसुल सहायक आवक जावक तहसिल कार्यालय पाथर्डी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन पञ दिले.
या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून, कोणत्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही याची खात्री करावी.शेतकऱ्यांचे उत्पन्न हेच त्यांच्या कुटुंबाचे जीवनाधार आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर शेतकरी आजही विश्वास ठेवून आहे. त्यामुळे हे निवेदन आपण गांभीर्याने घेऊन, तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी.तसेच आपल्या पाथर्डी तालुक्यात एकूण किती शेतकऱ्यांचे पंचनामे झाले व किती शेतकरी मदतीस पात्र आहेत व आज पर्यंत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतिची रक्कम जमा झाली या बाबत ची माहिती द्यावी.असे यावेळी निवेदन पञात शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
या निवेदन पञावर संदीप म्हातारदेव राजळे, बाळासाहेब गर्जै,रमेश कचरे,किसन आव्हाड, गणेश श्रीधर भगत, दादासाहेब पवार मेजर,सुखदेव कारभारी केदार, राहुन बाळासाहेब वायकर,
सुनिल मारुती ढाकणे, विशाल भास्कर खेडकर,ज्ञानेश्वर महादेव गोल्हार, राजेंद्र रंगनाथ ढाकणे तसेच इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
Tags :
91402
10





