महाराष्ट्र
9476
10
श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूलमध्ये एकदिवसीय शिबीर
By Admin
श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूलमध्ये एकदिवसीय तायक्वांडो प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
सिन्नर तालुका प्रतिनिधी: श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे सिन्नर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी एकदिवसीय तायक्वांडो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाळेची क्रीडा परंपरा जपत, विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवावेत या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री सुभाषजी देशमुख (बडेसर) चेअरमन सौ विजयाताई देशमुख(बडे मॅडम) संचालिका शिरीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
शाळेचे तायक्वांडो प्रशिक्षक आणि नॅशनल रेफ्री भगवान सोमनाथ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. शिबिरादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना तायक्वांडोमधील विविध तंत्रे, स्वसंरक्षणाचे महत्त्व आणि शिस्तीचे धडे दिले. त्यांना या कार्यात त्यांचे सहकारी राहुल सूर्यवंशी, अमोल राठोड, शुभम कुवर व शरयू सांगळे यांनी मोलाची मदत केली.विशेष नॅशनल रेफ्री श्री भगवान साबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन यामध्ये संरक्षणासह शारीरिक व मानसिक तयारीवर भर त्यासाठी शाळेकडून अध्यावत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले
शाळेचे प्रोत्साहन आणि सुविधा
नवजीवन स्कूलने आजवर तायक्वांडो या खेळात आपला दबदबा निर्माण केला आहे. खेळाडूंना सराव करण्यासाठी शाळेमार्फत प्रशस्त हॉल, अद्ययावत स्पोर्ट्स इक्विपमेंट आणि मॅट्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भविष्यातही विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी शाळेचे क्रीड़ा विभाग प्रमुख श्री प्रल्हाद देशमुख सर संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री बी.बी.पाटील सर,शाळेच्या प्राचार्या सौ अनिता सूर्यवंशी,सौ सविता फड,सौ प्रिती गुजराथी,सौ योगिता भाटजिरे, श्री नरेंद्र वाघ सर उपस्थित होते मान्यवरांनी प्रशिक्षकांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags :
9476
10




