महाराष्ट्र
193080
10
पाथर्डी तालुका शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्यात आग्रेसर
By Admin
पाथर्डी तालुका शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्यात आग्रेसर- शिक्षणाधिकारी भास्कर पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षकांची कार्यशाळा
पाथर्डी प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व पंचायत समिती पाथर्डी आयोजित शिष्यवृत्ती पूर्व उच्च प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्ग शिक्षकांची कार्यशाळा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
श्री तिलोक जैन माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले की, पाथर्डी तालुका ऊस तोड कामगाराचा तालुका म्हणून जरी अग्रेसर असला तरी शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्यात अग्रेसर आहे,मिशन आरंभ उपक्रमामुळे पालक जिल्हा परिषदच्या शाळेकडे वळू लागले असून जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढत आहे, जिल्हा परिषदच्या अनेक शाळेत विविध शाळांनी गुणवत्तेत आपला ठसा उमटवला आहे.
जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती जयश्री कार्ले यांनी पाथर्डी तालुक्यात सध्या चालू असलेल्या ऑनलाईन दर्जेदार तासिका बद्दल या तासिका च निश्चितच विद्यार्थी ना अंतिम परीक्षा मध्ये उपयोग होईल, असे सांगितले. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड, श्री अजय भंडारी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा नोडल अधिकारी जयश्री कार्ले म्हणाल्या की, पाथर्डी तालुक्यात अनेक गुणवंत शिक्षक आहेत. अनेक शाळांचे निकालही चांगले लागले आहेत. त्यामध्ये सोमठाणे नलवडे, घाटशिरस, मढी, चितळी या शाळेचे निकाल चांगले लागले आहेत.
कार्यशाळेस श्री चंद्रकांत उदागे , बंडू गाडेकर ,श्रीम. स्वाती आहेर , श्रीम. आशा गर्जे हे या तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक पाथर्डी तालुका नोडल अधिकारी रामनाथ कराड यांनी केले. सूत्रसंचालन महादेव कौसे व सुनिल खेडकर यांनी केले तर रामकिसन वाघ यांनी आभार मानले. या प्रसंगी सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री संतोष घोगरे, रामकिशन वाघ, सौ. संध्या पालवे, महेंद्र राजगुरू, बंडू गाडेकर, बाळासाहेब वामन यांनी परिश्रम घेतले.
Tags :
193080
10





