तौते चक्रीवादळाचा महावितरणला फटका,वीज वाहिन्या व विद्युत यंञणेचे नुकसान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 18 मे,मंगळवार
तौते चक्रीवादळाचा महावितरणला अहमदनगर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या फटक्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विदुयत यंत्रणेचे नुकसान झाले. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. वाऱ्याची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आहे.
जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र प्रभावित झाले होते. त्यापैकी उपकेंद्र सुरु करण्यात आले. ११९ वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यापैकी ४७ सुरु करण्यात आल्या. ३, हजार २८६ रोहित्रे बंद झाली होती. त्यापैकी १ हजार २१२ रोहित्रे सुरु करण्यात आली. यामुळे २९९ गावे सुद्धा प्रभावित झाली आहेत.
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. जिल्ह्यात व शहरात ‘ वादळामुळे वीजयंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्याने अनेक वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.