अहमदनगर शहरात भाजीपाला,किराणा दुकान खुली होणार
By Admin
अहमदनगर शहरात भाजीपाला, किराणा दुकान खुली होणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 14 मे 2021, शुक्रवार
नगर शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने एक जूनपर्यंत वाढविले असून वेळेची मर्यादा घालून भाजीपाला, किराणा दुकाने खुली ठेवली आहेत. आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भात आदेश लागू केला आहे. एक जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
नियमानुसार हे व्यवहार सुरू राहतील :
वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने सुरू राहील.
अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
घरपोहोच गॅस वितरण सेवा सुरू राहील.
सर्व बँका सुरू राहतील.
दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री : सकाळी ७:०० ते ११:०० सुरू राहील.
पशुखाद्य विक्री : सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.
कृषी विषयक दुकाने (विक्री दुकाने), कृषी सेवा केंद्रे : सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आणि पुरवठा वाहतूक सकाळी ११.०० ते दुपारी १.०० सुरु राहील.
कोरोना विषाणू नियमाचे उल्लघंन केल्यास प्रथम पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. दुस-यावेळेस पाच रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाईल.
किराणा दुकाने : सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत सुरु राहील. पुरवठा वाहतूक सकाळी ११.०० ते दुपारी १.०० सुरु राहतील. कोरोना विषाणू नियमाचे उल्लघंन केल्यास प्रथम १० हजार रुपये दंड अकारला जाईल. दुस-यावेळेस १० हजार रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाईल.
भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री : सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत सुरु राहील. कोरोना विषाणू नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम एक हजार रुपये दंड आकारला जाईल. दुस-यावेळेस एक हजार रुपये आकारुन माल जप्त केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत भाजी / फ़ळे एका जागेवर लावून विक्रि करता येणार नाही, असे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

