मुंगुसवाडे येथे स्व. सौ. इंदूमती व जगन्नाथराव बुधवंत कोवीड सेंटरचे उद्घाटन
पाथर्डी प्रतिनिधी -
पाथर्डी तालुक्यातील मुंगूसवाडे येथील श्रावण भारती बाबा प्रशाला येथे परिवर्तन प्रतिष्ठान संचलित स्व. सौ. इंदुमती व जगन्नाथ बुधवंत (IAS) कोवीड केअर सेंटर चे रविवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ९:३० वाजता उद्घाटन करण्यात आले.
मुंगुसवाडे येथे परिवर्तन प्रतिष्ठान संचलित भालगांव च्या लोकप्रिय सरपंच डाॅ.मनोरमाताई खेडकर यांच्या आईवडिलांच्या नावाने स्व. सौ. इंदुमती व जगन्नाथराव बुधवंत (IAS ) कोवीड केअर सेंटरचे उदघाटन भालगावचे सुपुत्र प्रदुषण आयुक्त दिलीपराव खेडकर आणि सिध्देश्वर संस्थान शिरूर चे अध्यक्ष ह.भ.प. स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते आणि प्रांताधिकारी देवदत्त केकान व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
खरवंडी येथे परिवर्तन प्रतिष्ठान च्या वतीने सुरू केलेले कोवीड सेंटरची क्षमता पूर्ण झाल्याने भालगाव, मिडसांगवी,मुंगूसवाडे, एकनाथवाडी आणि आजूबाजूच्या वाड्या- वस्त्यांच्या नागरिकांना कोरोनाच्या प्राथमिक उपचारासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून मुंगूसवाडे येथे परिवर्तन प्रतिष्ठान च्या विद्यमाने हे दुसरे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, भाजपा राज्य महिला प्रमुख अॅड. भाग्यश्री ढाकणे, मुंगसवाडे सुपञ हायकोर्टचे अॅड. अविनाश खेडकर,पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, पत्रकार दादासाहेब खेडकर , मुगुसवाडे सरपंच ,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जगन्नाथ गुळवे,ह.भ.प. गहिनीनाथ खेडकर गुरूजी, ग्रामपंचायत सदस्य केशव खेडकर, तुकाराम तात्या खेडकर, प्रा.परमेश्वर खेडकर, बाळासाहेब खेडकर,लहुजी सेना युवा नेते अभिमान कांबळे ,संजय बेद्रे, कमलाकर कासुळे, सागर कासुळे, तुकाराम केदार, मनोज खेडकर, ऋषिकेश खेडकर आदींची उपस्थिती होती .