रस्त्यावर फिरणा-यांची होणार कोराना चाचणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 17 मे 2021,सोमवार
काेराेना संसर्गाचे अहमदनगर जिल्ह्यात थैमान सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीसह विविध निर्बंध लागू केले आहेत. तरी देखील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी दिसते. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्रत्येक पाेलीस ठाण्यातंर्गत दाेन चेक पाॅईंट, तर अहमदनगर शहरात चार ठिकाणी चेक पाॅईंट स्थापन हाेतील, अशी माहिती पाेलीस अधीक्षक मनाेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रस्त्यावर फिरणाऱ्यांची काेराेना चाचणी हाेणार आहे. चाचणीत अहवार पाॅझिटिव्ह आल्यास संबंधिताची नाेंद घेऊन त्याला काेविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येईल. या कार्यवाहीत पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागामार्फत पाेर्टलवर नाेंद घेतली जाईल. प्रत्येक चेक पाॅंईटवर चाचणीसाठी वैद्यकीय कर्मचारी आणि पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.