सभासदांना 'हा' कारखाना देणार मोफत साखर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सालाबादप्रमाणे दिपावलीनिमित्त मोफत १५ किलो साखर वाटप करण्यात येणार आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व सभासदांची साखर बिले १४ ऑक्टोबर पर्यंत घरपोहच दिली जाणार आहे. सर्वांनी २४ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या काळात आपली साखर कारखाना गोडावून मधून घेवून जावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले आहे.