पाथर्डी तालुक्यात चोरी करणाऱ्या 'या' व्यक्ती नगरमध्ये जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात चोरी करणार्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमधील सिद्धार्थनगर परिसरात अटक केली. कृष्णा महादेव काशिद (वय 24 रा. शेकटे ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजीचे दिलीप आत्माराम अकोलकर यांच्या घराच्या बाथरूमची सिमेंट खिडकी अज्ञात चोरट्याने तोडून सोन्याचे दागिणे, मोबाईल असा 46 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी अकोलकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा कृष्णा काशिद याने केला असून तो सिद्धार्थनगर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक पाठवून आरोपी काशिद याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा एक मोबाईल हस्तगत केला आहे.