दरोडेखोरांच्या क्रूरतेचा कळस ,दोन महिलांवर अति प्रसंग करत धक्कादायक प्रकार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तोंडाळीत शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ दोन महीलावर बलात्कार
परीसरात दहशतीचे वातावरण
पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोरांनी येथील शेतवस्तीवर हल्ला चढविला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली. त्यांना बांधून ठेवत घरातील २३ वर्षीय आणि ३० वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला.तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्रीतून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पैठण तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याला हादरा बसला आहे.या शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे. दरम्यान
घटनास्थळी पोलीस दाखल असून पुढील तपास केला जात आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान या दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरोडेखोरांची पुरुषांना बेदम मारहाण
दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे. दरोडेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पुढील तपास बिडकीन पोलीस आणि ग्रामीण पोलीस करत आहेत.