महाराष्ट्र
कवडदरा विद्यालयात कोरोना नियमाचे पालन करत शाळा सुरू
By Admin
कवडदरा विद्यालयात कोरोना नियमाचे पालन करत शाळा सुरू
विद्यार्थ्यांचे गुलाब फूल व शालेय साहित्य व पाठ्यपुस्तक देऊन केले स्वागत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्ग कोरोना नियमाचे पालन करत सुरू झाले आहेत.तसेच
शासन नियमा प्रमाणे (दि.०४) सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत शालेय साहित्य पेन भेट देऊन तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांनी केले.
सकाळीच विद्यार्थ्यांनी शाळेसमोर गर्दी केली होती.विद्यालयात पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जात आहे.
ब-याच कालावधीनंतर शाळेत प्रत्यक्ष पाऊल ठेवत असल्याने आणि मित्र परिवार पुन्हा भेटल्याने विद्यार्थी देखील उत्साहात दिसून आले.
कोरोना केसेसचे प्रमाण परीसरात कमी असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. कोरोना प्रतिबंध संबंधी सर्व नियमांचे पालन करुन शाळा सुरु झाली आहे.
विद्यालयातील सर्व वर्ग खोल्यामध्ये, तसेच कार्यालयमध्ये सॕनिटायझर फवारणी करण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी थर्मल गण,अॕक्सीमीटरने करत त्यांची नोंद ठेवण्यात आली असून शिक्षकांचीही थर्मल गण तपासणी करण्यात आली.
तसेच सर्व शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विद्यालयाने स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली असून, त्यामध्ये साबण आणि पाणी २४ तास उपलब्ध राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. वर्गखोल्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एका बाकावर एक जण बसविण्यात आले.याची काळजी घेण्यात येत आहे.
वर्गात अधिकाधिक हवा खेळती राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप करण्यात आले आहे.
यावेळी प्राचार्या सौ.जे.एस.नायकवडी, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags :
7261
10