कोल्हा नथुराम मुर्दाबादची घोषणा जारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली असल्याने सध्या राजकारण तापले आहे. कोल्हे वादाच्या केंद्रस्थानी असून, अहमदनगर शहरातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने 'कोल्हा नथुराम मुर्दाबाद'ची घोषणा जारी करण्यात आली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसारखा पेहराव करुन जनतेच्या सहानुभूतीवर खासदार झालेल्या कोल्हे यांनी नथुराम गोडसेची वादग्रस्त भूमिका साकारून कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा प्रकार केल्याचा आरोप करुन या लोकप्रतिनिधी विरोधात डिच्चू कावा करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करण्याबाबत युक्तिवाद केला आहे. परंतु तो जनतेला पटलेला नाही. महात्मा गांधीजी यांची हत्या करणारा नथुराम गोडसेची भूमिका साकारून देखील कोल्हे यांना खंत वाटली नाही व जनतेची त्यांनी माफी देखील मागितलेली नाही. यामुळे कोल्हे हे गुट्टलबाज सत्तापेंढारी असल्याचे सिध्द होते. कोरोनाचे संक्रमण कमी होताच याविरोधात दिल्ली दरवाजा वेस येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रतिमा पायदळी तुडविण्यात येणार आहे. तर अशा मस्तवाल लोकप्रतिनिधीला धडा शिकवण्यासाठी 'जय शिवाजी, जय डिच्चू कावा', तंत्राचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
या आंदोलनासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.