महाराष्ट्र
शिक्षण विभागास टाळे ठोकल्यानंतर 'या' शाळेला मिळाला शिक्षक
By Admin
शिक्षण विभागास टाळे ठोकल्यानंतर 'या' शाळेला मिळाला शिक्षक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला मेहंदूरी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर शिक्षण विभाग लगेच ताळ्यावर आला.
जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने अकोले तालुक्यातील मेहेंदुरी गावातील नागरिकांनी पंचायत समिती अकोले येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला आज टाळे ठोकले.याची तात्काळ दखल घेतली नाही तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश कानवडे यांनी प्रशासनास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार सदर ठिया उपोषणाची दखल अकोले पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी यांनी घेतली. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी यात यशस्वी मध्यस्थी करून मेहेंदुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे सांगितले.आमदार डॉ.किरण लहामटे व जिल्हा परिषद सदस्य गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या यशस्वी मध्यस्थीने आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. कुमावत यांच्या लेखी आश्वासनानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेहेंदुरी येथील डॉ.अविनाश कानवडे व विद्यार्थी पालक यांनी आंदोलन मागे घेतले. कार्यालयाला टाळे ठोकल्याने शिक्षण विभाग लगेच ताळ्यावर आला.
ग्रामस्थांची व पालकांची मागणी जिल्हा परिषद मेहेंदुरी येथील शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहे.पर्यायाने सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ही मागणी घेऊन मेहेंदुरी जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश कानवडे, सिद्धेश मोहोटे, विकास चासकर, नितीन बंगाळ, गणेश वाबळे, सुरेश गायकवाड, रोहिदास पवार, सुनील आरोटे, सतीश बंगाळ, प्रशांत बंगाळ, सागर आरोटे आदी पालक पंचायत समिती येथे आंदोलनासाठी उपस्थित होते.
Tags :
430
10