Breaking- भरलेल्या रिटर्नमध्ये चुका दुरुस्त करता येणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर संदर्भात अर्थमंत्र्यांनी माेठी घाेषणा केली. रिटर्न दाखल केल्यानंतर ज्या चुका दुरूस्ती करण्यासाठी संधी मिळणार आहे. उत्पन्न, आकडा चुकल्यास ताे दुरुस्तीसाठी किंवा सुसूत्रीकरणासाठी दाेन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबत करदात्यावर विश्वास ठेवला जाणार आहे.
- सहकार क्षेत्राला १८ टक्के कर भरावा लागताे. ताे आता १५ टक्क्यांवर आणला जाणार आहे.
- काॅर्पाेरेट साेसायटींना १ ते १० काेटी उत्पन्न असलेल्यांना सात टक्के कर कमी करण्यात आला आहे.
- दिव्यांगांच्या विमा याेजनेत बदल, पालक जिवंत असताना दिव्यांग पाल्याला त्याचा फायदा मिळणार
- केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या कर एकसारखा असणार
- स्टार्टअपमधील कर सवलत एक वर्षांनी वाढवली
- देशातील काही जागतिक पातळीवर उत्पादन घेणार्या कंपन्यांना एक वर्षासाठी करामध्ये दिलासा
- क्रिप्टाे उत्पन्नावर ३० टक्के कर द्यावा लागणार
- ग्रुपमध्ये काम करणार्या कंपन्यांचा सरचार्ज कमी केला जाणार, ताे १५ टक्के असणार
- सरचार्ज कमी झाल्यास स्टार्टअप ग्रुप हाेण्यासाठी फायदा हाेणार
- आराेग्य आणि शिक्षणावरील सेझ हा उत्पन्नात धरला जाणार नाही
- कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी याेजना
- जाहीर न केलेल्या उत्पन्नावरील ताेटा मान्य केला जाणार नाही