महाराष्ट्र
182
10
ढाकणे बंधू कडून १५ हजार रुपये श्रीकृष्ण गोशाशाळेस भूदान म्हणून दान
By Admin
ढाकणे बंधू कडून १५ हजार रुपये श्रीकृष्ण गोशाशाळेस भूदान म्हणून दान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील स्व. दत्तात्रय ढाकणे बाबा यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमीत्त अशोक दत्तात्रय ढाकणे व शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे या ढाकणे बंधूनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ श्रीकृष्ण गोशाळा करडवाडी गोशाळेचे संस्थापक दिपक महाराज काळे यांच्याकडे दोन गुंठे भुदानासाठी १५ हजार रुपये दान केले.
यावेळी येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांचे हरी किर्तन झाले. त्यांनी संतसंगती व सतसंगतीचे माहत्म्य आपल्या हरी किर्तनात सांगितले तसेच बाबांच्या भक्ती मार्गातील आठवणीला उजाळा दिला.
यावेळी ह.भ. नारायण महाराज वृद्धेश्वरकर, प्रा. संजय वारे महाराज, तांदळे महाराज, कांताबापु देवढे महाराज ,तोगे महाराज, धनंजय गर्जे महाराज, मल्हारी महाराज घनवट , आंधळे महाराज व भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे. सभापती सुनीताताई दौंड , राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, अॅड नामदेव जायभाय, आर.पी. आयचे महेश अंगरखे, बबनराव बांगर, नारायणराव पालवे, शेवगांव खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब विघ्ने,मुंजाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंतराजे कराड, राष्ट्रीय शेतकरी युनीयन तालुकाध्यक्ष हारी वायकर, तालुका सरचिटणीस गुलाबभाई शेख, काका काळुसे, जाजू शेठ उपस्थीत होते.
दिपक महाराज काळे यांनी बाबांच्या त्यांच्याबरोबरच्या गोशाळेतील आठवणीला उजाळा दिला व श्रीकृष्णगोशाळेच्या वतीने अंदराजली आर्पण केली.यावेळी नारायण महाराज वृद्धेश्वरकर, प्रा. संजय महाराज वारे, तोगे महाराज, तांदळे महाराज, शिवशंकर राजळे,अॅड नामदेव जायभाय, बबनराव बांगर,हारी वायकर, बाळासाहेब विघ्ने, आनंत कराड, महेश अंगाखे यांनी बाबांविषयीच्या आठवणी आपल्या श्रद्धांजलीमध्ये व्यक्त केल्या. यावेळी वारकरी संप्रदायातील भक्त व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित संत मंडळीच्या व मान्यवरांच्या प्रती शेतकरी नाते बाळासाहेब ढाकणे ऋणानुनिर्देश व्यक्त केले व शेवटी ह.भ.प. दिपक महाराज काळे यांनी पसायदान म्हणुन पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता केली.
Tags :

