शेतकऱ्यांसाठी कळसपिंपरी गावचे सरपंच दिगू शेठ भवार उतरणार रस्त्यावर
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी,सुसरे,सोमठाणे, पागोरी पिंपळगाव, कोरडगाव परिसरातील सर्व शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे संपूर्ण शभंर टक्के पंचनामे करून, शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कळसपिंपरी गावचे विद्यमान सरपंच दिगू शेठ भवार यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांच्याकडे पञ पाठवून निवेदन केले आहे.
भवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी होऊन 15 दिवस झाले असून, प्रशासनाने तालुक्यातील अतीवृष्टी झालेल्या गावामध्ये नुकसान झालेल्या पिकाचे,तसेच दुकानाचे अजून सर्व पंचनामे केलेले नाहीत. काही गावामध्ये घराचे नुकसान झालेले आहे. पाऊस सर्वत्र झाल्याने पिकांचे सरसकट नुकसान झालेले आहे. प्रशासन पंचनामा करते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात अजूनही फुटकी कवडी सुद्धा मिळाली नाही.
'मिळाली ती फक्त निराशा'
येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मंगळवार (दि. 05) रोजी भारतीय जनता पार्टी च्या वतीने सरकारच्या निराशाजनक संतापामुळे सरकार विरोधात बैठा सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचे सरपंच दिगू शेठ भवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रति तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस स्टेशन, पाथर्डी आणि गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.