एस टी बस सुरू झाल्याने ग्रामीण भागातील शाळा गजबजल्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विविध एस टी च्या बस सुरू झाल्याने माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थितीची लगबग वाढली आहे .कोरोना मुळे गेल्या दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील एस टी बस च्या फेऱ्या उत्पन्नाआभावी बंद कराव्या लागल्या होत्या परीणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींची शाळेत जाण्यासाठी गैरसोय निर्माण झाली होती शासनाच्या अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शासनाच्या वतीने देण्यात येतो जिल्ह्यामध्ये हजारो विद्यार्थिनी याचा लाभ घेत असतात शाळा सुरू झाल्या परंतु बस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती यासंदर्भात अहमदनगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेनेही माध्यमिक शिक्षणाधिकारी, विभागीय नियंत्रक यांना निवेदन देऊन बस सुरू करण्यासंदर्भात लक्ष वेधले होते आज नेवासा डेपोने नेवासा गळनिंब बस सुरू केल्याने पालक वर्गाने आनंद व्यक्त केला कारण या मार्गावर जळके, सलाबतपुर, गोगलगाव,गलनिंब अशी माध्यमिक विद्यालये आहेत आज गोगलगाव येथे बस आल्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास भारस्कर यांनी वाहक, चालक यांचा सुदामराव मते पाटील विद्यालयाच्या वतीने सत्कार केला यावेळी शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यवाह संजय भुसारी,नानासाहेब घुले, बाळासाहेब घावटे, दत्तात्रय काळे,पांडुरंग उगले ,प्रवीण पवार, समीर पठाण,विजय गायकवाड,रघुनाथ म्हस्के उपस्थित होते.