महाराष्ट्र
453
10
साकेगाव -डांगेवाडी रस्त्याकडे दुर्लक्ष,शाळेत येताना मुंलाची गैरसोय
By Admin
साकेगाव -डांगेवाडी रस्त्याकडे दुर्लक्ष,शाळेत येताना मुंलाची गैरसोय
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव - डांगेवाडी रस्त्यावर पुलाचे काम पुर्ण होत नसल्याने रस्त्याने आमले वस्ती,भडके वस्ती येथून दररोज सुमारे साठ ते सत्तर ये-जा करणारे ग्रामस्थ, वाहन चालक, शाळकरी मुले,शेतकरी,वयोवृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.नागरिकांना या ठिकाणी नदी ओलांडून प्रवास करावा लागत आहे.सद्धा तालुक्यात तसेच परीसरात पाऊस जास्त होत असल्याने नदीला पाणी जास्त आहेत.
शाळकरी मुले,वयोवृद्ध नागरिक ,शेतकरी,वाहनचालक यांना कमराइतक्या पाण्यातून वाट काढत चालावे लागत आहे.
परीसरातील नागरिकांना लोक प्रतिनिधीनी पुलाचे काम करण्यासंबधी आश्वासन दिले होते.परंतु आज पर्यंत कोणत्याही प्रकारचे पुलाचे काम सुरू होण्या संबधी कार्यवाही झालेली नाही.
ग्रामस्थांनी लोक प्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.शेतकऱ्यांना
घरातून शेताकडे आणि शेतातून घराकडे येता-जाता गुडघाभर चिखलातून त्यांना माथापच्ची करावी लागते. कधी बैलाची जोडीच बैलगाडीसह चिखलात फसते. कधी बैलगाडीचे चाकच पुढे सरकत नाहीत.
एकीकडे चिखलात पाय फसतात, अशी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती तालुक्यातील साकेगाव- डांगेवाडी रस्त्याची झाली आहे. रस्ता जीवघेणा झाला आहे.
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी खडतर ठरत आहे. बैलगाडी असो, सायकल, दुचाकी वाहने तसेच माणसांनाही इकडून-तिकडे जाण्यासाठी सर्वांचीच वाट लागते.
सध्या पाऊसधारा बरसत आहेत. शेतात सोयाबीन, कपाशी, मिरची, भाजीपाला आदी पिके सर्वत्र आहेत. अशावेळी दररोज शेतीची वाट धरावी लागते. अशातच पाऊस पडला की, मार्ग चिखलमय होतो. गुडघाभर चिखल तुडवीत या पाणंद रस्त्याचा खडतर आणि जीवघेणा प्रवास करावा लागतो. बैलांचे हाल-बेहाल होतात. मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे ही समस्या शेतकऱ्यांनी मांडली. अनेकदा मातीकाम, खडीकरण तसेच डांबरीकरण करून द्यावे, असे निवेदनही शेतकऱ्यांनी सोपविले. मात्र कवडीचाही फायदा झाला नाही. समस्या 'जैसे थे' असून या गंभीर समस्येकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Tags :

