कवडदरा विद्यालयात नांदी फाऊंडेशन नन्नीकली उपक्रम गर्ल चिल्ड डे साजरा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात
नांदी फाऊंडेशन नन्नीकली संस्थेमार्फत मार्फत गर्ल चिल्ड डे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.जे.एस.नायकवडी यांनी सरस्वती प्रतिमा पुजन केले.
तसेच
यावेळी नन्नी कली शालेय उपक्रम घेणाऱ्या सौ.दिपाली रोंगटे, सौ.मुंडे ,सौ.पावडे मॕडम, सौ.वाकचौरे मॕडम,सौ.भालेराव मॕडम,सौ.कुंदे मॕडम,सौ.वाकचौरे मॕडम,ज्यूनिअर काॕलेजचे प्रा.
श्री.जी.जे.जाधव तसेच इतर विद्यालयातील शिक्षिकासह नन्नी कली या उपक्रमात सहभागी होणाऱ्या इयत्ता पाचवी ते नववीतील शालेय मुली उपस्थित होत्या.
यावेळी प्राचार्या सौ.जे.एस.नायकवडी,प्रा.जी.जे.जाधव,
सौ.दिपाली रोंगटे,सौ.पावडे मॕडम,सौ.वाकचौरे मॕडम,सौ.भालेराव मॕडम यांनी उपक्रमात सहभागी मुलींना मार्गदर्शन केले.
यावेळी उपक्रमात सहभागी मुलीनी विशेष वेशभुषा करुन आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला.