महाराष्ट्र
1831
10
अतिवृष्टी पंचनामे करून शेतकऱ्यांची वसुली थांबवा
By Admin
अतिवृष्टी पंचनामे करून शेतकऱ्यांची वसुली थांबवा
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे छावाची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी चे पंचनाम्यासाठी अधिकारी येईपर्यत खळे झाले तरी पंचनामा करावा ,तसेच ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे आदेश देणे तसेच सर्व प्रकारच्या कर,कर्ज ,पाणीपट्टी ,ग्रामपंचयत थकबाकी वसुलीस स्थगिती मिळावी यासाठी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक गावांत ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात(नगर, पाथर्डी, शेवगाव, तालुक्यातील )अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन झालेल्या पशुधन हानी,पीक नुकसान भरपाई साठी पंचनामे सुरू आहेत. तलाठी, ग्रामसेवक,कृषिसहयक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचू पर्यत काही शेतकऱ्यांनी पाण्यातुन सोयाबीन सोंगुण खळे केले कारण सोयाबीन फुटून काहीच हाती आले नसते म्हणून सोयाबीन ,बाजरी,उडीत,मूग,भुईमूग,मका खळे झालेले पंचनामे व्हावेत, तसेच आक्टोबर महिन्यात झालेला पाऊस हा आपल्या प्रशासकीय भाषेत अवकाळी असतो म्हणून अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्यावेत. दि ०७/०९/२०२१ च्या पत्रा नुसार पाथर्डी, शेवगाव,नगर तालुक्यातील पशुधन हानी साठी जिल्हापरिषदेच्या योजनेतून पशुधन खरेदीसाठी पुरग्रस्त म्हणून दाखल देऊन सादर योजनेत प्राधान्याने पशुधन हानी झालेल्याची लाभार्थी म्हणून इतर कोणतेही निकष न लावता निवड करावी तसे पत्र जिल्हापरिषदेच्या मुखकार्यकारीअधिकारी यांना द्यावेत. पंचनामे होऊन मदत मिळते किंवा नाही मिळत तोपर्यत सरकारी थकबाकी , बैंक कर्ज वसुलीस,पाणीपट्टी,ग्रापंचयत थकबाकी,शेतीपापंचे वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावी. शासनाने एकरी५०हजार रुपये मदत घ्यावी. पीकविमा १००%मंजूर करावा. यासह इतर मागण्यांसाठी आपल्याकडे
अखिल भारतीय छावा संघटनेच्या विनंती करण्यात येत आहे.
निवेदनावर नितीन पटारे (जिल्हा अध्यक्ष), प्रवीण देवकर (जिल्हासरचिटनीस), दत्ता वामन (जिल्हा सल्लागार दक्षिण), शैलेश धुमाळ(शहर संघटक) निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस अधीक्षक आदींना पाठविल्या आहेत.
Tags :

