महाराष्ट्र
17247
10
शेवगाव बस आगार 'या' कारणामुळे शंभर टक्के बंद राहणार
By Admin
शेवगाव बस आगार 'या' कारणामुळे शंभर टक्के बंद राहणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अधिक माहिती अशी की, शेवगाव आगाराची शेवगाव-गेवराई बस चापडगाव इथे आरोग्य केंद्राजवळ प्रवाशी उतरवण्यासाठी थांबलेली असताना, चुकीच्या बाजूने ओहरटेक करणाऱ्या डबल ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरचा कट एसटी बसला लागला.
शेवगाव डेपोच्या एसटी बसला चुकीच्या बाजूने ओहरटेक करताना डॅश मारून एसटी बसचे नुकसान करण्यात आले. दरम्यान याबाबतची फिर्याद घेण्यास शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केली.
पोलिसांच्या या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ रात्री बारा वाजेपासून शेवगाव आगारातील चालक-वाहकांनी शेवगाव बस आगार बंद केला आहे.
ट्रॉलीच्या हेलकाव्यात बसच्या डाव्या बाजूचा आरसा फुटून बसला काही नुकसान झाले. याबाबत चालकाने शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित ट्रॅक्टर चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार अर्ज दिला होता.
मात्र पोलिसांनी तक्रार अर्ज नाकारत गुन्हा दाखल केला नाही. अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी दिलीप लबडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने याचा निषेध म्हणून शेवगाव आगाराच्या चालक-वाहकांनी रात्री पासून एसटी बस आगार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लबडे यांनी सांगितले.
एसटी बसला डॅश मारणारा ट्रॅक्टर हा शेवगाव तालुक्यातील एका राजकीय पदाधिकार्यांच्या नातेवाईकांचा असल्याची चर्चा असून त्यामुळे पोलिसांनी राजकीय दाबावातून ट्रॅक्टर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल न केल्याची चर्चा आहे.
एकीकडे संप सुरु असताना शेवगाव आगारातील वाहक-चालक जीव धोक्यात टाकून प्रवाशांना सेवा देत असताना पोलिसांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे लबडे यांनी सांगितले.
जो पर्यंत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत शेवगाव बस आगार शंभर टक्के बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)