अहमदनगर- पाथर्डी भाजपकडून महावितरण कार्यालयाला टाळे लावून आंदोलन
पाथर्डी- प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी पाथर्डी तालुका जिल्हा अहमदनगर च्या वतीने शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय पाथर्डी येथे टाळे लावून आंदोलन करण्यात आले. शेती पंप व घरगुती वापराची वीजबिल वसुली सक्तीने होऊ नये, लॉक डाऊनच्या कालावधीत घरगुती वापराचे सहा महिन्यांचे वीजबिल माफ करावे, 100 युनिटपर्यंत वीज बिल माफी करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, महिला अध्यक्षा काशीताई गोल्हार, पंचायत समिती सभापती गोकुळ भाऊ दौंड, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे , उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, अजय भंडारी, सचिन वायकर, सुनील ओहोळ,एकनाथ आटकर, राहुलदादा राजळे,सोमनाथभाऊ खेडकर, सुभाष केकान, रमेश गोरे, मंगलताई कोकाटे, बजरंग घोडके,अनिल बोरुडे, महेश बोरुडे, नामदेव लबडे, प्रवीण राजगुरू, ॲड. संपत गर्जे, बाळासाहेब आकोलकर, चारुदत्त वाघ, बाबासाहेब किलबिले ,अभिजीत गुजर, नारायण पालवे, प्रमोदकाका भांडकर, भगवान साठे,अजय रक्ताटे, बंडू बोरुडे, बबन बुचकुल, किशोर परदेशी, पांडुरंग सोनटक्के, युसुफ शेख, जमीर आतार, आदी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी , कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.