शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अधिवेशनानंतर सकारात्मक मार्ग काढू, यांनी दिले आश्वासन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
धुलीवंदनाच्या दिवशी देखील राज्यभरातून हजारो शिक्षक या परिषदेसाठी हजर झाले होते (Sharad Pawar Gave Assurance That will take positive approach to pending Issues of teachers).
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद आणि वार्षिक अधिवेशन आज पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचे (Teachers) प्रलंबित प्रश्न उद्याच्या उद्या सोडवू असे नाही, तर आता अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन संपल्यावर आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र बसून यातून नक्की मार्ग काढू, अशी ग्वाही यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.
जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी यावेळी सर्व शिक्षक वर्गाने लावून धरली होती. तर, यावर मी स्वतः सर्व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन पवारांनी शिक्षकांना दिले.