महाराष्ट्र
पाथर्डीचे लोकप्रतिनिधी संधीसाधु - शिवशंकर राजळे
By Admin
पाथर्डीचे लोकप्रतिनिधी संधीसाधु - शिवशंकर राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे,जी कामे मंजूर झालेली असतात किंवा दुसऱ्या पदाधिकारी अथवा अधिकाऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले असतात त्याच श्रेय घेण्याचं काम तालुक्याच्या लोकप्रतिनिधी करत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी आमदार मोनिका राजळे यांच नाव न घेता केली.ते काल जवखेड येथील ना प्राजक्त तनपुरे यांनी उदघाटन केलेल्या विकास कामांच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते,यावेळी जेष्ठ नेते काशिनाथ लवांडे,राहुल गवळी,अमोल वाघ,अजय पाठक,सुधा वांढेकर,संदीप राजळे यांच्यासह पाथर्डीच्या पश्चिम भागातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नगर तिसगाव शेवगाव औरंगाबाद असा नवीन राष्ट्रीय महामार्ग होत आहे त्याची अधिसूचना निघाल्याची बातमी प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी दिली त्या बातमी मध्ये त्यांनी कोठेही आमदारांचा उल्लेख केलेला नाही. पण याचा सुगावा लागताच आमदारांनी तीन दिवस आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन हे काम माझ्या शिफारशीने झाले असे शेवगाव पाथर्डीतील जनतेला भासवण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारच या रस्त्याचा डीपीआर बनवण्याचं काम दहा वर्षांपासून सुरू होत माध्यतरी बजेट जास्त झाल्याने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग कडे हस्तांतरित झाला.ही सर्व माहिती प्रकल्प संचालक यांनीच दिल्याने हा सर्व आमदारांचा बनाव उघड झाला.
याआधी देखील शेवगाव तालुक्यातील चापडगाव ते हातगाव आणि हातगाव कांबी ते ते जिल्हा हद्द ही दोन कामे मा प्रताप काका ढाकणे यांच्या शिफारशीने उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांनी दोन कामे मंजूर केली होती त्याचंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदारांनी केला होता पण तिथेही बांधकाम विभागातील उपमुख्यमंत्री यांच्या शिफारशीच पत्र आल्याने त्यांचा बनव उघड झाला होता.
एकीकडे राज्यसरकार काम करत नाही अशी टीका करायची आणि दुसरीकडे पाथर्डी शेवगाव आणि भगवानगड पाणी योजना सह इतर कामे याच महाविकास आघाडी सरकारने मंजूर केल्यावर श्रेय घ्यायला पुढं यायचं अस राजकारण करायचं ही बनवाबनवी आता शेवगाव पाथर्डी तील जनता ओळखून आहे अशी टीका शिवशंकर राजळे यांनी केली.
Tags :
1248
10