पाथर्डी तालुक्यात 'या' ठिकाणी स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने एकच चर्चा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजित आव्हाड हे पहाटे फिरण्यासाठी मोहटा देवी रोड वरून जात असताना त्यांना निवासी मूकबधिर विद्यालयाजवळ बेवारस अवस्थेत कपडे गुंडाळून एका मच्छरदानित वाढले. किमान सात ते आठ दिवसांपूर्वी जन्मलेले एक अर्भक आढळून आल्या नंतर त्यांनी या घटनेची माहिती निवासी मूकबधिर विद्यालयातील दत्तात्रय बढे यांना दिली.
पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी शहरातील मोहटा देवी रोड लगत असलेल्या निवासी मूकबधिर विद्यालयाच्या दारात एक स्त्री जातीचे अर्भक बेवारसरित्या आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
त्यानंतर या दोघांनी या अर्भकाला उचलून विद्यालयात आणून ठेवत या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल रोकडे, होमगार्ड लता शीळवने व शंकर भुजबळ हे गेले व त्यांनी या अर्भकाला ताब्यात घेतले. या संदर्भात अज्ञात आरोपींविरोधात पोलीस कॉन्स्टेबल संदीप कमलाकर कानडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहे.