जिल्हा बँकेवर आमदार आशुतोष काळे जिल्ह्यातून बिनविरोध निवड
By Admin
जिल्हा बँकेवर आ. आशुतोष काळे यांची बिनविरोध निवड
नगर- प्रतिनिधी
जिल्ह्याची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेती पू...
कोपरगाव प्रतिनिधी :- जिल्ह्याची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेती पूरक मतदार संघातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आशुतोष काळे जिल्ह्यातून बिनविरोध निवड झाली आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मंडळाच्या निवडणुकीच्या शेतीपूरक मतदार संघातून आमदार आशुतोष काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होवून शेतीपूरक मतदार संघातून देखील आमदार आशुतोष काळे यांच्या अर्जासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून विक्रमी ३६ अर्ज दाखल करण्यात आले होते.
या मतदार संघातून एकूण ८३२ सभासदांना मतदारांचा अधिकार होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसा (दि.११) पर्यंत एकून ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शेतीपूरक मतदार संघातून आमदार आशुतोष काळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी असलेल्या शेतीपूरक मतदार संघातून आमदार आशुतोष काळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होवून त्यांची जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी स्व. सौ. सुशीलामाई काळे, स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आमदार अशोकराव काळे, सौ. पुष्पाताई काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी देखील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक म्हणून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.
आमदार आशुतोष काळे यांची बिनविरोध निवड होताच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, मा. चंद्रशेखर घुले, आ. नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, राजेद्र नागवडे,राजेंद्र फाळके आदी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, तसेच उद्योग समूहाच्या सलग्न संस्थांचे सर्व चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.
चौकट :- दिवसेंदिवस राजकारणाची दिशा बदलत असतांना त्यामुळे कोणतीही निवडणूक सोपी राहिली नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्हाभर व्याप्ती असलेल्या आशिया खंडात नावाजलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांची संचालकपदी जिल्ह्यात बिनविरोध झालेली निवड सोपी गोष्ट नसून त्यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या कर्तुत्वाला मिळालेली पोहोचपावती असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यानी बोलून दाखविल्या.