पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत उघडकीस आणले दरोड्याचे दोन गुन्हे
तालुक्यातील 'या' गावातील तरुणांना घेतले ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना तांत्रिक तपासावरून व गुप्त बातमीदाराकडून सदरचा गुन्हा हा गोकुळ विठ्ठल काळे (रा. टाकळी मानुर, ता पाथर्डी, जि. अहमदनगर ) याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केला असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी बाजार परीसरात सापळा रचून त्यास व इतर दोन आरोपी आकाश उत्तम भोसले, कृष्णा रेहमान चव्हाण ( सर्व रा.टाकळी मानुर, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर ) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा तसेच शिरूर पोलिस स्टेशन येथे दरोड्याचे दाखल असलेले असे दोन्ही गुन्हे त्यांचे आणखीन 3 इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे.
शिरूर पोलिस स्टेशन हद्द्दतील दोन दरोड्याचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत कवठे येमाई येथील फिर्यादी हे घरासमोर झोपलेले असताना दोन अज्ञात चोरट्यांनी येऊन गळ्यातील मंगळसूत्र तसेच दागिने, मोबाईल असे मिळून ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.
तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलिस नाईक, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, समाधान नाईकनवरे यांनी केला आहे.