महाराष्ट्र
गुटखा पुडी तोंडात रिकामी करताच तरुणाचा झाला भयावह शेवट
By Admin
गुटखा पुडी तोंडात रिकामी करताच तरुणाचा झाला भयावह शेवट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गणेश जगन्नाथ दास असं मृत पावलेल्या 37 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा परिसरातील रहिवासी असून तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. घटनेच्या दिवशी मृत गणेश कंपनी मालकाच्या घरी डिश टीव्ही बसवण्यासाठी गेला होता. नेहमीप्रमाणे त्याला गुटखा खाण्याची सवय असल्यानं त्यानं डिश टीव्ही बसवत असताना देखील गुटखा खाल्ला होता.
जोरदार ठसका लागल्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला होता. दरम्यान आसपासच्या नागरिकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली आहे.
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील उस्मानपुरा परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाला गुटखा खाणं (Ate gutka) चांगलंच महागात पडलं आहे. काम करत असताना तोबरा भरून गुटखा खाल्यानंतर त्याच्यासोबत विपरीत घडलं आहे.
त्यानं आपल्या खिशातून गुटख्याची एक पुडी तोंडात रिकामी केली होती. यानंतर त्याच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोमोजच्या नादात गमावले 12 लाख, औरंगाबादेतील व्यावसायिकासोबत घडला विचित्र प्रकार गणेश याला जोरदार ठसका लागल्यानं तो बेशुद्ध होऊन जागीच कोसळला. पुढच्याच क्षणी आसपासच्या नागरिकांनी त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
याठिकाणी गेल्यानंतर रुग्णालयातील डॉक्तरांनी गणेशची प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. गणेशच्या अन्ननलिकेत सुपारीचा खांड अडकल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुटखा खाताना तरुणाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
तंबाखूला लावायला चुना मागताच झाला राडा; हाणामारीत चाकू खुपसून पाडला रक्ताचा सडा दुसऱ्या एका घटनेत, कोल्हापुरात तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणातून एका व्यक्तीची चाकू खुपसून निर्घृण हत्या (murder with sharp weapon) करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील धामोड येथील ही घटना आहे. अनिल रामचंद्र बारड असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी आरोपी जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार यांच्याकडे चुना मागितला होता. चुना मागितल्याच्या कारणातून यांच्यात वाद सुरू झाला होता. यातूनच एकाने अनिल यांच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात अनिल बारड यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
Tags :
84196
10