महाराष्ट्र
329
10
दादापाटील राजळे महाविद्यालयात अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयात अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. राहुलदादा राजळे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात कार्यरत असलेल्या संगणकशास्र विभागाच्या नवीन अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्ष इंजि. शिवाजीराव राजळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेतील नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. तंत्रज्ञानाची ही आवश्यकता लक्षात घेऊन संगणकशास्र विभागामध्ये बनवण्यात आलेल्या या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेमुळे संगणकशास्र विभागातील विद्यार्थ्याना अभ्यासक्रमासोबत नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर निर्मिती करणे शक्य होणार आहे. या संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून बी. एस. सी. संगणकशास्र या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन मा. इंजि. शिवाजीराव राजळे यांनी याप्रसंगी केले. संगणकशास्र विभागातील नवनवीन उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी विकास प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री. आर. वाय. म्हस्के होते. संगणकशास्र विभागप्रमुख प्रा.चंद्रकांत पानसरे यांनी संगणक प्रयोगशाळेतील नवीन उपकरणे व तंत्रज्ञानाबद्दल मान्यवरांना माहिती दिली. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाबद्दल तसेच बदलत्या शैक्षणिक धोरनाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रामकिसन काकडे, मार्गदर्शक जे. आर. पवार, भास्करराव गोरे, प्राचार्य डॉ. युवराज सूर्यवंशी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. राजू घोलप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. एम. एस. तांबोळी व आभार प्रा. श्यामराव गरड यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र इंगळे यांनी केले. याप्रसंगी श्री विक्रमराव राजळे, डॉ. अतुलकुमार चौरपगार, प्रा. आसाराम देसाई, प्रा. अशोक काळे, प्रा. संजय म्हके, प्रा. अंजुम सय्यद, प्रा. योगिता इंगळे, प्रा. अंकिता इंगळे, प्रा. तेजस्विनी राजळे, प्रा. अस्लम शेख, योगेश वावरे, विष्णु साप्ते यांनी परिश्रम घेतले.
Tags :

