महाराष्ट्र
डॉ. गणेश शेळके आत्महत्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक व पाथर्डी पोलीस निरीक्षकांना म्हणणे सादर करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश
By Admin
डॉ. गणेश शेळके आत्महत्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक व पाथर्डी पोलीस निरीक्षकांना म्हणणे सादर करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश
न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिल्याने सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे.
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असतांना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गणेश शेळके यांनी उपकेंद्र तच गळफास घेऊन आत्महत्या केली होती याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. यानंतर डॉ शेळके यांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती यानंतर न्यायालयाने सदरील कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा पोलीस अधीक्षक व पाथर्डी पोलीस निरीक्षक यांना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचा आदेश दिल्याने जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पुढील माहिती अशी की मंगळवार ६ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पाथर्डी तालुक्यातील
करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ.गणेश शेळके यांनी उपकेंद्रातच छताच्या पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली.
डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती
मी डॉ.गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे. यास कारणीभूत तालुका वैद्यकिय अधिकारी व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर जबाबदार आहे. वेळेत पेमेंट न करणे, कामाचा अतिरिक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे या कारणावरून मी आत्महत्या करत आहे. अशी अशी सुसाईट नोट देखील डॉक्टरांनी लिहून ठेवली होती मात्र या सुसाईड नोटमध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावे असल्याने पोलिसाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाली होती यानंतर गुन्हा दाखल व्हावा म्हणून अनेक सामाजिक संघटनेने आवाज उठवून आंदोलने देखील केले होते मात्र त्याचा कुठलाही परिणाम पोलिस यंत्रणेवर झाला नाही यानंतर मयत डॉक्टर गणेश शेळके यांच्या पत्नीने ॲड एन बी नरोडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती यानंतर न्यायालयाने सदरील प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक व पाथर्डी पोलीस निरीक्षक यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायालयात उपस्थित राहून म्हणने सादर करण्याचा आदेश दिल्याने याप्रकरणी सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आता याबाबत पोलिसांकडून काय म्हणणे सादर केले जाते व याप्रकरणी काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील आता सामाजिक संघटनेकडून पुढे येऊ लागली आहे.
Tags :
2738
10