विज्ञानाबरोबर मुलांना अध्यात्माचे ही धडे द्या तर नवी पिढी वाचेल, - इंदुरीकर महाराज
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
१७५ वर्षांपूर्वी सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांनी
गावागावात पोहोचवली. ज्यांनी देव पाहिला नाही त्यांनी नारायणगिरी महाराज यांना पाहावं ते साक्षात ब्रह्म होते त्यांनी प्रवचन कीर्तनामधून शेवटच्या श्वासापर्यंत
जगाला उपदेश केला, असे निरुपण समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी केले.ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन सेवेत बोलत होते.
इंदोरीकर महाराज म्हणाले, विज्ञानाबरोबर मुलांना अध्यात्माचे ही धडे द्या तर नवी पिढी वाचेल, शाळेतील मुलांना हरिपाठ अभंग याचे ज्ञान द्या त्याचा अर्थ समजावून सांगा. रोज पाच मिनिटे
अध्यात्माचे शिक्षण द्या, असे सांगत बंद पडलेला पोहेगाव हरिनाम सप्ताह सद्गुरु गंगागिरीजी महाराज व ब्राह्मलिन नारायण गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने पुन्हा सुरू झाला आहे .
आता तो कधीच बंद पडणार नाही, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले. इंदुरीकर महाराज यांचे संतपूजन नितीन औताडे व राजेंद्र कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.