महाराष्ट्र
दीड कोटीचा औषधसाठा जप्त
By Admin
दीड कोटीचा औषधसाठा जप्त
गर्भपात, नशा आणणाऱ्या, उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांसह अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी शहरातील एका गोदामावर पोलिस पथकाने छापा घालून प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा जप्त केला. या औषधांची शासकीय किंमत ३५ लाख, तर बाजारमूल्य सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी जमील महबूब शेख (वय ३५, रा. राहुरी) व अख्तर चाँद शेख (वय २१, रा. राहुरी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध औषध निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा (गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५), कुणालाही इजा करण्याच्या उद्देशाने मादक किंवा विषारी औषधे देण्याच्या कलमान्वये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आज (बुधवारी) दुपारी सव्वातीन वाजता राहुरी शहरातील बारागाव नांदूर रस्त्यावरील शिवचिदंबरम मंगल कार्यालयाजवळील एका पत्र्याच्या गाळ्यावर पोलिस पथकाने छापा घातला.
यावेळी गर्भपात, नशा आणणाऱ्या, उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांसह अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, औषध ड्रग्ज इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर दरंदले यांच्या पथकाने छापा घातला.
आज आरोपींना औषधसाठा इतरत्र हलवायचा होता. त्यासाठी अख्तर याने गाळा उघडण्याची वेळ आणि पोलिसांची छापा टाकण्याची वेळ एकच झाली. यातील नशेच्या गोळ्या खाऊन गुन्हेगार बेफाम होऊन गुन्हे करतात, असे पोलिस निरीक्षक दराडे यांनी सांगितले.
आरोपीने विविध औषधांच्या दुकानांमध्ये प्रतिबंधित औषधे विक्रीसाठी पुरविल्याचा संशय आहे. त्यांनी कोणकोणत्या औषधांच्या दुकानांत प्रतिबंधित औषधे पुरविली, याची आरोपींकडून माहिती घेऊन, अशा औषधविक्रेत्यांना सहआरोपी केले जाईल.
- प्रताप दराडे, पोलिस निरीक्षक, राहुरी.
Tags :
7416
10