Breaking- पैसे घेवून बनावट लग्न लावून देणारी 'ही' टोळी जेरबंद
By Admin
Breaking-पैसे घेवून बनावट लग्न लावून देणारी 'ही' टोळी जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सुपे येथील एका जणाबाबत घडली. मध्यस्थांमार्फत आळंदी येथे 26 व 27 फेब्रुवारीस गवळी यांना मुलगी पहावयास बोलावले. तेथे बनावट आधार कार्ड, जन्मदाखलाही दाखविला. नंतर मुलगी पसंत झाल्यावर, मुलीच्या घरची गरिबी आहे. चांगले लग्न करण्यासाठी पैशांची मागणी केली. वरपक्षाकडून दोन लाख तीस हजार रुपये घेतले. नंतर संबंधित व्यक्ती परागंदा झाल्या. मात्र, याबाबत सुहास गवळी याने मुलीसह तीन महिला व एका पुरुषाविरोधात सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, एक पुरुष व एका महिलेस अटक केली, तर मुख्य आरोपी एक महिला मात्र अद्यापही पसार आहे.
यात अमित रामचंद्र मारोते (रा. औरंगाबाद), मुलीची आई व अल्पवयीन मुलगी (दोघी रा. पोहेगाव ता. कोपरगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मध्यस्थ व संशयित महिला ज्योती धनंजय लांडे (रा. वाघोली, पुणे) ही पसार झाली आहे.
पारनेर: वंशाला दिवा हवा, या अट्टहासापायी दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घटत आहे. मुले व मुली यांच्या व्यस्त प्रमाणामुळे गावोगावी अनेक मुले लग्नाविना राहिली.आपली लग्ने आता होणार का, या चिंतेत मुलांसह त्यांचे पालकही चिंतेत आहेत.
याचाच फायदा घेत, फसवून लग्न लावण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच सुपे येथे अशी घटना घडली. अल्पवयीन मुलगी दाखवून सुमारे अडीच लाखांना संबंधितांनी गंडा घातला. मात्र, यातील एक पुरुष व मुलीसह तिच्या आईस पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी एक महिला मात्र अद्याप पसार आहे.
खेड्यापाड्यांत अनेक मुलांचे लग्नाचे वय होऊन गेले तरीही त्यांना मुली मिळेनात. त्यातच शेती करणारी व नोकरी नसलेल्या मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता बनावट मुलगी दाखवून कधी कधी लग्नही लावून देऊन फसवणूक करणारी टोळी लग्नानंतर पैसे व दागिने घेऊन मुलीसह पसार होत आहेत. असे प्रकार आता मोठ्या प्रमाणावर घडू लागलेत.