ग्रामपंचायती मालामाल; तुमच्या ग्रामपंचायतीकडे किती आले पैसे? पहा.
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ग्रामपंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या मुळातच विकास कंन्साठी निर्माण केल्या आहेत. या माध्यमातून अनेक समाजउपयोगी कामे केली जातात.
याचाच एक भाग असते ती म्हणजे ग्रामपंचायत.
स्थानिक स्वराज्य संस्थासाठी विविध निधी प्राप्त होत असतात.
आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १५ व्या वित्त आयोगाकडून मागील वर्षीचा ४९ कोटी ७२ लाखांचा दुसरा हप्ता जाहीर झाला आहे. यापूर्वी गेल्या दोन वर्षांत ग्रामपंचायतींना ३७४ कोटी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के प्रमाणे ४६ कोटी ७८ लाख असा एकूण ४६७ कोटींचा निधी मिळालेला आहे.
त्यात आता आणखी निधीची भर पडली. त्यामुळे गावागावांत विकास कामांची भर पडणार आहे.
१५ व्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या हप्त्यात ग्रामपंचायतींना ४० कोटी ५३ लाख तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी ४ कोटी ५९ लाखांचा निधी मिळणार आहे. नगर जिल्ह्यासाठी अनटाईड निधीपोटी ४९ कोटी ७३ लाखांचा निधी जाहीर झाला असून तो लवकरच मिळेल, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाकडून मिळाली.
१५ व्या वित्त आयोगाचा निधी अनटाइड व टाइड अशा दोन प्रकारचा असतो. अनटाइड निधी गावातील विकास कामांच्या गरजेनुसार वापरला जातो, तर टाइड निधी हा शासनाकडून ठरविण्यात आलेल्या फक्त ठराविक कामांसाठीच खर्च करायचा असतो.
आता अनटाईड निधीपोटी ४९ कोटी ७३ लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याने विविध विकास कामांना गती मिळणार आहे.