अहमदनगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकरांचे नाव"; मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर नामांतरणाच्या विषयाला भाजपने उचलून धरलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी देखील जूनी नावं बदलून शहरांना नवीन नावे देण्याचा सपाटा लावला आहे.
महाराष्ट्रात देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतराला हिरवा कंदील दिला होता. मात्र त्यावर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेऊन परवानगी दिली आहे. अशातच आता एकनाथ शिंदे अजून एका शहराच्या नामांतरणाचा विषय हाती घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नाव धाराशीव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नवी दिल्ली येथील विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यात आलं आहे. याचबरोबर आता अहमदनगर शहराला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता यावरून राजकारण होण्याची शक्यता आहे.