मोहटे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पांडुरंग दहिफळे, व्हा. चेअरमनपदी विशाल दहिफळे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मोहटे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पांडुरंग दहिफळे तर व्हा. चेअरमन पदी विशाल दहिफळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहाय्यक निबंधक कार्यालयात चेअरमन , व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक -एक अर्ज दाखल करण्यात आला. चेअरमन पदासाठी पांडुरंग दहिफळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला तर व्हाईस चेअरमन पदासाठी विशाल दहिफळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. ए. थोरात यांनी चेअरमनपदी पांडुरंग दहिफळे तर व्हा. चेअरमन पदी विशाल दहिफळे हे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले.
सहाय्यक अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव आर.बी. गरकळ यांनी कामकाज पाहिले. शंकर दहिफळे व संतोष दहिफळे यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली . तसेच हर्षवर्धन पालवे व माणिक दहिफळे यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
या निवडीनंतर मोहटे ग्रामस्थांनी पेढे वाटप करून या निवडीचे स्वागत केले. त्यावेळी ज्येष्ठ संचालक भीमराव पालवे, भरत दहिफळे, महादेव दहिफळे, रावसाहेब सोनवणे ,सुलाबाई दहिफळे, द्वारकाबाई घुले ,अर्जुन दहिफळे, बाबासाहेब दहिफळे, गोरक्ष दहिफळे, अजय आव्हाड, अंबादास दहिफळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे आमदार मोनिका राजळे तसेच ॲड. प्रताप ढाकणे यांनी अभिनंदन केले.