महाराष्ट्र
गावठी कट्टा दाखवताना दिराकडून ट्रिगर दबला, गोळीबारात वहिनीचा मृत्यू
By Admin
गावठी कट्टा दाखवताना दिराकडून ट्रिगर दबला, गोळीबारात वहिनीचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पोहेगाव येथे घडली घटना
Crime News : भावाच्या पत्नीला गावठी कट्टा दाखवत असताना दिराकडून ट्रिगर दाबला गेल्याने गोळी थेट भावजयीच्या डोक्यातून आरपार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नजीकच्या पोहेगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गंभीर जखमी झालेल्या भावजयीवर रुग्णालयात उपचार उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला असून फरार झालेल्या संशयित आरोपी दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशाल भालेराव असे संशयिताचे नाव आहे तर सुनिता भालेराव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे गुरुवारी सकाळी ही गोळीबाराची घटना घडली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी विशाल भालेराव हा महिलेचा दीर असून त्याने गावठी कट्टा आणला होता. हा गावठी कट्टा वहिनी सुनिता भालेराव यांना दाखवत असताना आरोपीकडून ट्रिगर ओढला गेला आणि गोळी सुनिता भालेराव यांच्या डोक्यात आरपार घुसली. घटना घडल्यानंतर आरोपी दीर घटना स्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे आदींनी घटनास्थळी धाव घेतली, अशी माहती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे.
गोळीबारानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिता यांना आगोदर खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर शिर्डी, नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळी थेट डोक्यातून आरपार घुसल्याने सुनिता या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे उपाचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर फरार झालेला आरोपी दीर विशाल भालेराव याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चुकून गोळी सुटली की त्यानेच गोळी झाडली, अशा चर्चांना उधाण आले आहे. आरोपीकडे अनधिकृत गावठी कट्टा कुठून आला? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Tags :
1148
10