कासार पिंपळगाव सोसायटी निवडणूक 13-0 विजय
सोसायटीवर आ.मोनिका राजळे यांची सत्ता कायम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर आ.मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी विकास मंडळ पॕनलने आपली सत्ता कायम ठेवत सर्व जागावर 13-0 ने विजय मिळवला आहे.
चार जागा बिनविरोध झाल्या होत्या.तसेच
(दि.19)रोजी जिल्हा परीषद शाळा कासार पिंपळगाव येथे एकूण नऊ जागेसाठी एकूण -714 पैकी 612 मतदान झाले.मतदानाच्या दिवशी मतमोजणी याच ठिकाणी शाळेत झाली असून पुढीलप्रमाणे अनुक्रमे उमेदवारांनी विजय मिळवत मते मिळवली आहे.
कवळे बाळासाहेब रामभाऊ- 524 , भगत वसंतराव परसराम-455 , भगत विनायक माणिक-503 , म्हस्के व्दारकानाथ विठ्ठल- 486 , राजळे दिलीप रखमाजी- 146, राजळे विक्रम बलभिम-516 , राजळे सुनिल हौसराव- 175 , राजळे संभाजी गोविंद -505, राजळे संभाजी ठकाजी-481,शेळके दत्ताञय बाबुराव-461
अनुसुचित जाती/अ.जमाती मतदार संघातून तिजोरे कांतिश चंद्रभान-504, तिजोरे सुरेश विश्वनाथ-95
अशी मते मिळाली आहेत.
जगंदबा सहकार विकास आघाडी पॕनलने लढवलेल्या तीन जागेपैकी एकही जागा मिळवता आली नसली तरी मतदान आकडेवारीत 150 पेक्षा जास्त मते मिळवण्याचा टप्पा पार केला आहे.
अशाप्रकारे सत्ताधारी पॕनलचा विजय झाला असून आ.मोनिकाताई राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी विकास मंडळ पॕनलचा विजय झाला असून फटाक्याची आताषबाजी व गुलाल उधळण करण्यात आली.