काष्टी गावातील तीन युवकांचा ऊसाच्या टॕक्टरला मोटारसाईकल धडकून अपघाती मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील तीन युवकांचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
काष्टी गावातील बाजारतळ परिसरात ऋषिकेश महादेव मोरे (वय 26), स्वप्निल सतिश मनुचार्य (वय 24) आणि गणेश बापू शिंदे (वय 25) हे तिघे दुचाकीवरुन जात होते. रविवारी (ता. १३) रात्री दुचाकीवरुन एकत्र जात असताना दुचाकी ट्रॅक्टरला धडकली आणि अपघात झाला. या अपघातात ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश या तिघांचाही मृत्यू झाला आहे. गावातील तरुण मुलांचा अपघातात जीव गेल्यानंतर या मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश हे तिघे जण दुचाकीवरुन रविवारी रात्रीच्या सुमारास जात होते. यावेळी रस्त्यावर एक ऊसाचा ट्रॅक्टर उभा होता. दौंड पाटस रस्त्यावर त्यांची दुचाकी आली असता दुचाकीवरील युवकांना समोर उभा असलेला ट्रॅक्टर दिसला नाही आणि अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे युवकांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अपघाताबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.