महाराष्ट्र
व्यायाम शाळा साहित्य ;1 कोटी 25 लक्ष रुपयाचा निधी मंजूर
By Admin
व्यायाम शाळा साहित्य ;1 कोटी 25 लक्ष रुपयाचा निधी मंजूर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील 25 गावांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडांगण योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असून संबंधित गावामध्ये या विभागामार्फत साहित्य पोहोच करण्याचे काम सुरू झाले आहे अशी माहिती आ शंकरराव गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.
तालुक्यातील विविध गावांमधील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण होऊन तरुण सुदृढ व्हावेत यासाठी माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांच्या मार्फत जिल्हा क्रीडांगण योजने अंतर्गत बंदिस्त व खुले या दोन्ही प्रकारचे नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील प्रस्ताव क्रीडा विभागाकडे पाठवून त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला त्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्यानुसार निंभारी, वडाळा बहिरोबा, उस्थळ दुमला, बहिरवाडी, खडका, माका, वरखेड, राजेगाव, लोहारवाडी, खुपटी, सोनई, शिंगवेतुकाई , जेऊर हैबती, पिंप्री शहाली, जळके खुर्द, दिघी, मुकिंदपुर, भेंडा बुद्रुक, गेवराई, भालगाव, बाभुळखेडे, गोंडेगाव, अंतरवली, तरवडी, देडगाव या नेवासा तालुक्यातील गावांना व्यायाम शाळा साहित्याचा लाभ मिळणार आहे. विविध गावांमधील तरुण, मित्रमंडळ यांनी वेळोवेळी व्यायाम शाळा साहित्याची मागणी आ. शंकरराव गडाख यांच्याकडे केली होती. या मागणीची
योग्य ती दखल घेऊन आ. गडाख यांनी महाराष्ट्र शासनाच्या व जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लक्ष रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मंजूर केले आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येकी 5 लक्ष प्रमाणे व्यायाम शाळा साहित्य देण्यात येणार असल्याने गावांमधील तरुण, ग्रामस्थ आदींनी माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहे.
माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांनी तरुणांच्या मागणीच्या वचणपुर्तीसाठी विशेष प्रयत्न करुन व्यायाम साहित्य मंजूर केल्यामुळे तरुणांना गावांतच व्यायाम करणे शक्य होणार आहे.व्यायाम साहित्य विशेष प्रयत्नपूर्वक मंजूर केल्याबद्दल आ. गडाख साहेबांचे युवा क्रांती ग्रुप भालगाव यांच्या वतिने आभार.
- अजय तनपुरे अध्यक्ष( युवा क्रांती ग्रुप) भालगाव
Tags :
2973
10