लाकडी दांडके, दगडांनी पोलिसांवर खुनी हल्ला; मारहाण, फुटलेल्या बाटलीने वार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सदर घटना कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे घडली आहे. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दौलत पवार यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा देखील प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
समजलेली माहिती अशी : कोपरगाव मधील भिल्ल वस्ती, जवळके येथे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले होते. पोलिसांना पाहताच आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करून जखमी केले.
यावेळी आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दौलत पवार यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या खाजगी वाहनांची तोडफोड केली.
तसेच मोबाईल फोडून दहशत माजविली. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १५ लोकांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आठ आरोपींना पोलसानी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना प्रचंड मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.