महाराष्ट्र
Breaking- कृषि विभागाकडून खरिपासाठी 8 लाख 38 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित तयारी
By Admin
Breaking- कृषि विभागाकडून खरिपासाठी 8 लाख 38 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित तयारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिह्यात खरिपासाठी 8 लाख 38 हजार 946 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये खरीप हंगामासाठी 7 लाख 14 हजार 453, 2020 मध्ये 8 लाख 38 हजार 621 आणि 2021 मध्ये 8 लाख 9 हजार 13 हेक्टरवर खरीप हंगामासाठी पेरणी झाली होती. प्रत्यक्षात झालेल्या पेरणीच्या आधारे पुढील हंगामाची पेरणी होणारे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. खरीप हंगामात प्रामुख्याने जिह्यात बाजरी, सोयाबीन आणि कपाशीचे क्षेत्र अधिक असून, दक्षिण जिह्यात मूग, उडीद यांसह अन्य कडधान्य पिकांना प्राधान्य देण्यात येते. सुरुवातीचा दमदार पाऊस झाल्यास कडधान्य पिकांची पेरणी 15 जूनपर्यंत पूर्ण होते.नगर जिल्ह्यात 15 मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस पडत असतो. या पावसाने दमदार हजेरी लावल्यास कडधान्यांसह अन्य पिकांची पेरणी सुरू होते. यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाने आतापासून खरीप हंगामाची तयारी सुरू केली असून, पेरणी होणारे संभाव्य क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत मान्सूनपूर्व आणि सुरुवातीच्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरीप हंगामाचे चित्र बदलले आहे. जिह्यात खरिपासाठी 70 हजार 21 क्विंटल बियाणाची मागणी कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. जिह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 47 हजार 904 हेक्टर क्षेत्र असून, 2021 ला प्रत्यक्षात 8 लाख 9 हजार हेक्टर पेरणी झाली होती. यंदा त्यात संभाव्या वाढ करण्यात आली असून, यंदा पावसाने साथ दिल्यास जिह्यात 8 लाख 38 हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
तालुकानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)
नगर 71 हजार 117, पारनेर 85 हजार 382, श्रीगोंदा 55 हजार 681, कर्जत 82 हजार 34, जामखेड 63 हजार 63, शेवगाव 72 हजार 841, पाथर्डी 72 हजार 174, नेवासा 42 हजार 192, राहुरी 44 हजार 187, संगमनेर 77 हजार 984, अकोले 44 हजार 187, कोपरगाव 53 हजार 138, श्रीरामपूर 32 हजार 734, राहाता 41 हजार 701.
Tags :
11625
10