महाराष्ट्र
Breaking-ऊसतोड करणाऱ्या मुकादम पिता-पुत्रांचा माय-लेकीवर धक्कादायक कृत्य
By Admin
Breaking-ऊसतोड करणाऱ्या मुकादम पिता-पुत्रांचा माय-लेकीवर धक्कादायक कृत्य
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासे तालुक्यात घटना घडल्याने शिवून पोलिसांनी गुन्हा नेवासे पोलिसांकडे वर्ग केला. वडजी (ता. वैजापूर) येथून मुकादम जिब्राइल शेख, त्याचा मुलगा अन्वर शेख व शहनाज जिब्राईल शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नेवासे: ऊसतोड करणाऱ्या माय-लेकीवर मुकादम पिता-पुत्रांनी अत्याचार केला. याप्रकरणी शिवून पोलिस ठाणे ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे पीडितांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वडजी ता. वैजापूर येथील जिब्राइल बाबू शेख हा ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यांना मजूर पुरविण्याचे काम करतो. तो मजूर शोधण्यासाठी नांदगाव (जि. नाशिक) येथील एका कुटुंबाला भेटला. त्याने मजुरीपोटी या कुटुंबास २०१८ मध्ये एक लाख २० हजार रुपयांची उचल दिली. नेवासे तालुक्यात ऊसतोडणीचे काम सुरू असताना जिब्राइलचा मुलगा अन्वर याने मजुराच्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. ही घटना मुलीच्या आईला समजल्यावर तिने जिब्राइलकडे तक्रार केली. त्याने मुलीच्या आईस शिवीगाळ करत तिला दमदाटी करत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. सातत्याने सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलगी गर्भवती राहिली. तिचा वैजापूरला गर्भपात करण्यात आला.
घडलेला प्रकार पीडित महिलेने नांदगाव येथील बहिणीला सांगितला. बहिणीने आधार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अॅड. विद्या कसबे यांना ही घटना सांगितली. अॅड. कसबे यांनी येवल्यातील सीमा आरोळे, कॅथलिन जोगराव व पुण्यातील सहकारी संस्थेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलिस ठाणे गाठले. तेथे पीडितेच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि.३१) रात्री उशिरा तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा नेवासे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
माय-लेकींसह अल्पवयीन मुलीची सुटका
तपासात शिवून पोलिसांनी वडजी (ता. वैजापूर) येथून जिब्राइल शेख, त्याची पत्नी शहनाज, मुलगा अन्वर यांना ताब्यात घेतले. तसेच बंद घरातून पीडित माय-लेकींसह एका बारा वर्षीय मुलीची सुटका केली.
Tags :
26476
10