महाराष्ट्र
170
10
बॅग लिफ्टींग करणाऱ्या चोरट्यांना अटक; दोन लाखावर मुद्देमाल जप्त
By Admin
बॅग लिफ्टींग करणाऱ्या चोरट्यांना अटक; दोन लाखावर मुद्देमाल जप्त
पाथर्डी- घराची झडती घेतल्यावर मिळाला मुद्देमाल-
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बॅग लिफ्टींग करणाऱ्या चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद (Bag Lifting Thieves Arrested) केले. पोलिसांनी चोरट्यांकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत (2 lakhs seized from thief) केला आहे.
बॅग लिफ्टींग करणाऱ्या चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद (Bag Lifting Thieves Arrested) केले. पोलिसांनी चोरट्यांकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत (2 lakhs seized from thief) केला आहे. याबाबत गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी फिर्यादी अशितोष संभाजी खोडदे (रा. माळीवाडा विशाल गणपती समोर अहमदनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या मालकीचे २ लाख ७ हजार रुपये रोख रक्कम व चेक हे मर्चट बँकेमध्ये मार्केटयार्ड येथे भरणा करण्याकरिता दुचाकी गाडीने जात होते. यादरम्यान चाणक्य चौक परिसरात एका विना क्रमांकाच्या अपाची गाडीवरील २५ ते ३० वयोगटातील दोन अनोळखी चोरट्यांनी अशितोष यांना अडवून त्यांच्याकडील रोख रक्कमेची पिशवी व चेक हे बळजबरीने हिसकावून पळ काढला होता.
फिर्यादीवर पाळत ठेऊन लुटमार - या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं ८४८/२०२२ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवालीचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा हा फिर्यादीवर पाळत ठेवून झालेला असून फिर्यादी हे रोख रक्कम रोज कोणत्या वेळी घेवून जात असतात याची माहिती घेऊन ही चोरी करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी हे रतडगाव (ता.नगर) येथील असल्याची प्राथमिक माहीती मिळाल्यावरुन आरोपींच्या शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे एक पथक तयार करण्यात आले. आरोपी हे रतडगाव मध्ये राहण्यास असल्याची पक्की माहिती मिळाल्याने या ठिकाणी सापळा लावून मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचे दोन संशयित इसम मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातील आरोपींची नावे अमोल सोपान जाधव (वर्ष २४) आणि सुभाष बाबासाहेब जगताप (वय ३१ वर्ष) असे आहेत.
घराची झडती घेतल्यावर मिळाला मुद्देमाल- आरोपींच्या घराची झडती घेतली असता घरात चोरीस गेलेले स्वाक्षरी केलेले चेकबुक व चोरीत वापरलेली विना क्रमांकाची अपाची मोटार सायकल मिळून आली व त्यांनी चोरी केलेली दोन लाख सात हजार रुपये रक्कमही या पूर्वीची उधारी देण्याकरिता वापरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ही रक्कम गणेश लोणारे (रा. कापुरवाडी) यांना ३०,०००/- रुपये व दिलीप कुर्हे (रा.राघु हिवरे ता. पाथर्डी) यांना १,७५,०००/- असे एकूण २,०५,०००/- रुपये हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यातील फरार आरोपी चांगदेव याचा पोलीस शोध घेत आहेत.
या पोलिसांनी केली कारवाई- या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना/ योगेश खामकर, पोकाँ अमोल गाढे, पोकॉ सुजय हिवाळे, पोहेकाँ शरद वाघ, पोकॉ संदीप थोरात, पोकों सोमनाथ राऊत यांनी केली आहे.
Tags :

