सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढूनही सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील सुकळी येथील संतप्त शेतकर्यांनी नेवासा - शेवगाव राजमार्ग वरील कुकाणा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
अखेर माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या मध्यस्थीने रस्ता रोको मागे घेण्यात आला.
पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर 5 ऑगस्ट पर्यंत शासनाने मुदत वाढवून दिली. यामुळे पिकविमा भरण्यासाठी शेतकर्यांनी सेतू केंद्रावर पुन्हा गर्दी केली. मात्र 1 ऑगस्ट पासून दररोज रांगेत उभा राहुनही सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याने शेतकर्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली मात्र त्याचाही काहीही परिणाम सेतू चालकावर झाला नाही. अखेर संतप्त झालेल्या शेतकर्यांनी कुकाणा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची माहिती कळताच माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी घटनास्थळी येत आंदोलकांची भेट घेतली. यावर आंदोलकांच्या भावना समजावून घेत पांडुरंग अभंग यांनी तहसीलदार यांना बोलावून घेतले. यावर तहसीलदार यांनी शेतकर्यांचे पिकविमा उरविण्याचे आदेश सेतू चालकाला दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात भैरवनाथ भारस्कर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, बबनराव पिसोटे, माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर, मच्छिंद्र साबळे, किशोर साबळे, सचिन साबळे, लहू गुंड, दिलीप गुंड, संजय बर्डे, भाऊराव गुंड, खंडू पाटील, महादेव साबळे,
नानासाहेब गुंड, रखमाजी लिपणे, गणेश गुंड आदीसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.