महाराष्ट्र
Breaking-'या' जिल्हा परिषद सदस्यांना जिवे मारण्याची धमकी
By Admin
Breaking-'या' जिल्हा परिषद सदस्यांना जिवे मारण्याची धमकी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी दुरध्वनीवरून देण्यात आली.
या संदर्भात सुनीता भांगरे यांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी डोंबिवलीतील रामेश्वर गजानन शातलवार याच्या विरोधात निनावी संदेशाद्वारे धमकाविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अकोले तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत समजते की, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा मधील सुविधांचा अभाव तसेच येथील कारभाराबाबत सुनीता भांगरे यांनी आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील कारभाराचा पंचनामा केला. त्याचा राग मनात धरून मुतखेल आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचा भाऊ बोलतोय सांगून त्यांना फोन करून शिवीगाळ करण्यात आली. आमच्या वाट्याला जाऊ नका असे सांगून खुनाची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.
अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेनेचे तालुक्यातील नेते मारूती मेंगाळ यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढले. या त्यांनी म्हंटले आहे की, सुनीता भांगरे गेली अनेक वर्षांपासून अकोले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मध्यमातून नेतृत्व करत आहेत. मागील अनेक वर्ष प्रकल्प कार्यालय समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सक्षमपणे पार पडली आहे. काही दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील मुतखेल आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत आवाज उठवला होता.
काही प्रश्न त्यांनी उघडकीस आणले होते. प्रशासनावर अंकुश ठेवणे हे लोक प्रतिनिधींचे काम आहे. प्रशासनामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या निदर्शनात आणून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे लोक प्रतिनिधींचे काम आहे हे काम करत असताना जर कोणी चुकीच्या पद्धतीने एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांना धमकावत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी सुनीता भांगरे यांच्या केसाला धक्का लावून दाखवा. जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही देखील मैदानात येऊ असा इशारा मारुती मेंगाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
Tags :
45025
10